सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी, महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

Da Hike News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) एक आनंदाची बातमी आहे. महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ मंजूर करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ मंजूर केली आहे. आता कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. हा महागाई भत्ता 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.

 

👉 येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती 👈

 

सध्या महागाई भत्त्याचा दर 46 टक्के आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये त्यात शेवटची वाढ करण्यात आली होती. त्यावेळी केंद्र सरकारने महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली होती. यावेळीही 4 टक्के वाढ केल्यानं महागाई भत्ता आता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचेला आहे. महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग आहे. त्याची गणना मूळ वेतनाच्या टक्केवारीच्या आधारे केली जाते. ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना म्हणजेच पगारदारांना महागाई भत्त्याचा लाभ मिळतो, त्याचप्रमाणे निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या पेन्शनमध्ये महागाई सवलतीचा लाभ मिळतो

 

👉 येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती 👈

 

हा महागाई भत्ता मार्चअखेर पगारासह जमा केला जाणार आहे. यात एकूण दोन महिन्यांची थकबाकीही जोडली जाणार आहे. सलग चौथ्यांदा महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यानं सरकारच्या तिजोरीवर बोजा वाढणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता 1 जानेवारी 2024 पासून 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे. डिसेंबरच्या AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. डिसेंबरमध्ये निर्देशांक 0.3 अंकांनी घसरून 138.8 अंकांवर आला होता. परंतू, यामुळं महागाई भत्त्याच्या आकड्यांमध्ये विशेष फरक पडला नाही. अपेक्षेप्रमाणे, महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे गेला आहे.

Leave a Comment