सोन्याच्या दरात आतापर्यंतचा सर्वात मोठा धमाका इथे चेक करा सोन्याचे नवीन दर

Gold Silver Rate Today : सोन्याने दरवाढीत नरमाईचे धोरण स्वीकारले. सोन्याचा भाव उतरला. पण तरीही ग्राहकांना कुठलाच दिलासा मिळाला नाही. सोन्याच्या किंमती अजूनही गगनाला भिडलेल्या आहेत. तर चांदीने दोन दिवसांत 1,000 रुपयांचा पल्ला गाठला आहे. मार्च महिन्यानंतर एप्रिलमध्ये सोन्याने चढाई केली. एप्रिलच्या पहिल्याच दिवशी सोन्याने त्याची दिशा निश्चित केली. दुसऱ्या दिवशी सोने नरमले. किंमती कमी झाल्या. पण सोन्याचा भाव अजूनही गगनालाच भिडलेले आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीला सलग दहा दिवस सोने आणि चांदीने दरवाढीची सलामी दिली होती. त्यानंतर 21 आणि 29 मार्च रोजी किंमतींनी मोठी झेप घेतली.

 

👉 सोन्याच्या दरात मोठे बदल ; इथे चेक करा नवीन दर 👈

 

मार्च महिन्यात किंमतींनी कहर केला. पहिल्यांदाच सोने 67,000 आणि नंतर 70 हजारांच्या घरात पोहचले. चांदीने गेल्या महिन्याप्रमाणेच एप्रिलमध्ये आघाडी घेतली आहे. चांदी दोन दिवसांत हजार रुपयांनी वधारली आहे. सोने आणि चांदीच्या आता अशा आहेत किंमती मार्च महिन्याच्या अखेरीस सोने 2000 रुपयांनी महागले होते. 21 मार्च नंतर सोन्याने 29 मार्च रोजी उसळी घेतली. अनुक्रमे 1,000 रुपयांची आणि 1300 रुपयांची विक्रमी उडी घेतली. या 1 एप्रिल रोजी सोने 930 रुपयांनी वधारले. तर 2 एप्रिल रोजी 250 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 63,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

👉 सोन्याच्या दरात मोठे बदल ; इथे चेक करा नवीन दर 👈

 

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चांदीने 1100 रुपयांची उडी घेतली होती. 28 आणि 29 मार्च रोजी सलग 300 रुपयांची वाढ झाली. 30 मार्च रोजी किंमती 200 रुपयांनी वधारल्या. या 1 एप्रिल रोजी भाव 600 रुपयांनी वधारले. तर 2 एप्रिल रोजी 400 रुपयांनी किंमती वाढल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 79,000 रुपये आहे. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी वधारली.24 कॅरेट सोने 68,961 रुपये, 23 कॅरेट 68,685 रुपये, 22 कॅरेट सोने 63,168 रुपये झाले.18 कॅरेट 51,721 रुपये, 14 कॅरेट सोने 40,342 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 76,127 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

 

👉 सोन्याच्या दरात मोठे बदल ; इथे चेक करा नवीन दर 👈

 

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Leave a Comment